मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना  Pudhari Photo
गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील ५६९ ज्येष्ठ नागरिक करणार तीर्थक्षेत्रांची वारी

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा :मुख्यमंत्री तिर्थदर्शनयोजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ५६९ ज्येष्ठ नागरिकांचे प्रस्ताव पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत मंजूर करण्यात आले. तेव्हा ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लवकरच भारतातील तिर्थक्षेत्राची वारी करणार असून देवदर्शन करणार आहेत. राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना" राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ५६९ अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे.

सदर योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात वैष्णोदेवी मंदिर कटरा (जम्मू व काश्मिर) तिर्थक्षेत्राकरीता १३६ ज्येष्ठ नागरीकांची, श्रीराम मंदीर अयोध्या (उत्तरप्रदेश) तिर्थक्षेत्राकरीता २४०, महाबोधी गया तिर्थक्षेत्राकरीता ३३, काशी तिर्थक्षेत्राकरीता २६, विठोबा पंढरपूर तिर्थक्षेत्राकरीता ३२, तिरुपती बालाजी तिर्थक्षेत्राकरीता १७, द्वारकाधीश तिर्थक्षेत्राकरीता ७, काशी विश्वनाथ तिर्थक्षेत्राकरीता ४५, गंगोत्री मंदीर उत्तरकाशी तिर्थक्षेत्राकरीता २, महाकालेश्वर उज्जैन मंदीर तिर्थक्षेत्राकरीता १०, साईबाबा देवस्थान शिर्डी तिर्थक्षेत्राकरीता ८, सिद्धीविनायक मंदीर तिर्थक्षेत्राकरीता ५, केदारनाथ तिर्थक्षेत्राकरीता ३, अजमेर दर्गा तिर्थक्षेत्राकरीता ३, जगन्नाथ पुरी तिर्थक्षेत्राकरीता १, रामेश्वरम तिर्थक्षेत्राकरीता १, असे एकूण १६ तिर्थक्षेत्राकरीता एकूण ५६९ ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक लवकरच श्रीराम मंदिर, अयोध्या ची मोफत वारी करणार आहेत.

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेकरीता जिल्ह्यातील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगामैदान, गोंदिया येथे आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावे असे विभागाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.
- विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT