विदर्भ

गोंदिया : पुराच्या पाण्यात तरुण दुचाकीसह गेला वाहून

अविनाश सुतार

गोंदिया: पुढारी वृत्तसेवा: गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. दरम्यान, आज (दि.२१) पहाटे ३.३० च्या सुमारास न्यू लक्ष्मीनगर लोहीया वार्ड येथील रणजीतसिंग प्रीतमसिंग गील (वय २१) पुराच्या पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह वाहून गेला. आपत्ती निवारण पथकाला माहिती होताच सकाळपासून शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.

घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. राणी अंवतीबाई चौकात पुराचे पाणी २-४ फूट रस्त्यावर असल्याने दुकानात पाणी शिरले आहे. त्यातच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. एक ट्रकही पलटी झाला आहे. कुडवा नाका परिसरात पाणी साचले आहे. तर अंडरग्राऊंडमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT