गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुहास गाडे (Suhas Gade) यांची नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने काल (ता.२८) याविषयीचा आदेश जारी केला आहे.
सध्याच्या मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह वैद्यकीय रजेवर आहेत. त्यांच्या जागेवर सुहास गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुहास गाडे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील मूळ रहिवासी आहेत. २०२१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या गाडे यांनी संगणकशास्त्रात बी.टेकची पदवी संपादन केली आहे. शिवाय सायबर अँड नॅशनल सेक्युरिटी या विषयात त्यांनी पदव्युतर पदविका आणि पब्लिक मॅनेजमेंट या विषयात एमएचे शिक्षण घेतले आहे.
यापूर्वी सुहास गाडे हे पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी आणि यवतमाळचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.