पत्रकार परिषदेला पोलिस अधीक्षक नीलोत्पल, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, गोकुल राज जी  Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Naxalism | गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाचे ३१ मार्चपर्यंत समूळ उच्चाटन करणार : पोलीस अधीक्षकांचा निर्धार

Gadchiroli SP Neelotpal | पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुढारी वृत्तसेवा

March 31 deadline Naxal-free Gadchiroli

गडचिरोली: छत्तीसगड व भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चा म्होरक्या प्रभाकर याच्यासह ७ जहाल नक्षल्यांना ठार केल्यानंतर आता जिल्ह्यात केवळ ७ नक्षली शिल्लक राहिले आहेत. ३१ मार्चपर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

तीन दिवस व तीन रात्र अविरतपणे चाललेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांशी धैर्याने तोंड दिले. त्यात दीपक मडावी या जवानास वीरमरण आले, तर दुसरा जवान जखमी झाला. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या चकमकीत ७ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून, सर्वांची ओळख पटली आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी तथा कंपनी क्रमांक १० चा कमांडर प्रभाकर व कपंनी क्रमांक ५ चा कमांडर पागू मोड्याम या दोन मोठ्या कॅडरचा त्यात समावेश आहे. या सर्वांवर दोनशे गुन्हे दाखल असून, महाराष्ट्र शासनाने एकूण ७१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. प्रभाकरला आतापर्यंत दहावेळा आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु त्याने प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना कारवाई करावी लागली, असे नीलोत्पल म्हणाले.

आता गडचिरोली जिल्ह्यात केवळ ७ सशस्त्र नक्षली शिल्लक असून, त्यात गडचिरोली जिल्ह्यात राहणारे दोन आणि छत्तीसड राज्यात वास्तव्य करणाऱ्या ५ कॅडरचा समावेश आहे. त्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करावे; अन्यथा ३१ मार्चपर्यंत त्यांचाही बीमोड करु, असा इशारा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला.

पत्रकार परिषदेला पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, गोकुल राज जी उपस्थित होते.

नक्षल्यांनी १ हजार, तर पोलिसांनी फायर केले ५ हजार राऊंड

चकमकीत नक्षल्यांनी जवळपास १ हजार राउंड फायर केले, तर पोलिसांना ५ हजार राऊंड फायर करावे लागले. या चकमकीत आणखी नक्षली ठार झाले असावेत. त्याविषयी येत्या काही दिवसांत माहिती मिळेल, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले.

ठार झालेल्या नक्षल्यांविषयी माहिती

१) प्रभाकर उर्फ रवी उर्फ प्रकालवीर उर्फ स्वामी उर्फ लोकेती चंदरराव (५७) हा तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील इसरोजीवाडा येथील रहिवासी होता. तो दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी, पश्चिम सबझोनल ब्युरो तसेच कंपनी क्रमांक १० चा प्रभारी होता. त्याच्यावर ११३ गुन्हे दाखल असून, महाराष्ट्र शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

२) पागू मोडयाम (३०) हा छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील डल्ला येथील रहिवासी होता. तो सीवायपीसी तसेच कंपनी क्रमांक ५ चा कमांडर होता. त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस होते.

३) अनिला उर्फ बुदरी कोवाची (२४) ही छत्तीसगडमधील सुकमा येथील रहिवासी होती. ती प्रभाकरची अंगरक्षक होती. तिच्यावर १२ गुन्हे दाखल असून, ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

४) कामेश पदा (३५) हा छत्त्ीसगडमधील दरबा येथील रहिवासी होता. माड एरिया स्पेशल प्लाटूनचा कमांडर होता. त्याच्यावर ८ लाखांचे बक्षीस होते.

५) भजनाथ उर्फ भिमा होळी (४०) हा छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील टेकालगुडेमचा रहिवासी होता. परालकोट दलमचा एसीएम असलेल्य भजनाथवर ६ लाख रुपयांचे बक्षीस होते.

६) मंगली कुरसाम ही पश्चिम बस्तरची रहिवासी होती. कंपनी क्रमांक १० ची सदस्य असलेल्या मंगलीवर ४ लाख रुपयांचे बक्षीस होते.

७) जोगी सोडी-मडावी (२७) ही बिजापूर जिल्ह्यातील बुडगीचेरु येथील रहिवासी होती. कंपनी क्रमांक ५ ची सदस्य असलेल्या जोगीवर ६ लाख रुपयांचे बक्षीस होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT