गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे.  Pudhari News Network
गडचिरोली

पर्लकोटा नदीला पूर, भामरागड पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या दक्षिण भागात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. तेथील काही कुटुंबांना निवारागृहात हलविण्यात आले आहे. (Gadchiroli Heavy Rains)

मागील चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक १६४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद आहे. मुलचेरा तालुक्यातील दिना नदीला तसेच एका नाल्याला पूर आल्याने मुलचेरा-आष्टी मार्गही बंद असल्याची माहिती प्रशासनाने दिली. गडचिरोलीसह अन्य तालुक्यांमध्येही काल रात्री आणि आज सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली असून, दिवसभर हवामान ढगाळ आहे. मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Gadchiroli Heavy Rains)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT