Drug Free Gadchiroli Marathon Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Marathon |शेकडो पोलिस, विद्यार्थी धावले ‘ड्रग फ्री गडचिरोली’ मॅरेथॉनमध्ये

मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

पुढारी वृत्तसेवा

Drug Free Gadchiroli Marathon

गडचिरोली: गडचिरोली जिल्हावासीयांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आज जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त पोलिस दलाने शहरात 'ड्रग फ्री गडचिरोली' मॅरेथॉनचे आयोजन केले. या मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

संयुक्त राष्ट्रसंघाने १९८८ पासून २६ जून हा दिवस अंमली पदार्थविरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. त्या अनुषंगाने समाजात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, व्यसनमुक्त, निरोगी व सुरक्षित समाज निर्माण करण्याच्या हेतूने आज जिल्हा पोलिस दलाच्या वतीने 'ड्रग फ्री गडचिरोली' मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. सकाळी साडेसहा वाजता पोलिस कवायत मैदान ते हॉटेल लँडमार्कपर्यंत ही मॅरेथॉन झाली. पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह अन्य अधिकारीही यात सहभागी झाले होते.

व्यसन हे समाज आणि राष्ट्रासाठी घातक: एम.रमेश

शहीद पांडू आलाम सभागृहात मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी पोलिस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा, पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व सहभागींना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचे कौतूक करण्यात आले. व्यसन हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी गंभीर आव्हान आहे. अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि सेवन याविरोधात कठोर कारवाई करण्याबरोबरच जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पोलिस दल भर देत असल्याचे पोलिस अधीक्षक एम.रमेश यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT