दिल्ली येथे ब्रिटिश सरकारच्या उच्चायुक्त श्रीमती लिंडा कॅमरून यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान  Pudhari Photo
गडचिरोली

गोंडवाना विद्यापीठाला 'फिक्की' चा 'संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व' राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली,ता.१८: 'फिक्की' अर्थात 'फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' या राष्ट्रीय संस्थेकडून गोंडवाना विद्यापीठाला 'संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व' हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आज दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या 'फिक्की हायर एज्युकेशन समिट 2024' या कार्यक्रमात भारतातील ब्रिटिश सरकारच्या उच्चायुक्त श्रीमती लिंडा कॅमरून यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाला हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या वतीने एकल ग्रामसभा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेश मडावी आणि डॉ. मनीष उत्तरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

'फिक्की' संस्थेने भारतातील सहा विद्यापीठांना सादरीकरण करण्यासाठी बोलावले होते, त्यानंतर तीन विद्यापीठांचे नामांकन या पुरस्काराकरिता करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ राबवीत असलेल्या 'गाव तिथे विद्यापीठ', 'सीआयआयआयटी', 'एसटीआरसी', या नावीन्यपूर्ण आणि अन्य सामाजिक उपक्रमांचीही 'फिक्की'ने यानिमित्ताने दखल घेत गौरव केला. गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी पेसा कायदा, सामूहिक वन हक्क कायदा, जैव विविधता कायदा, वन व्यवस्थापन व संरक्षण, गौण वन उपजव रेकार्ड व अंकेक्षण यांचे प्रशिक्षण देऊन ग्रामसभाना आतापर्यंत 235 वन व्यवस्थापन आराखडे तयार करण्याकरिता तांत्रिक मदत केली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT