मुनघाटे महाविद्यालयाच्या ‘मृदगंध’ वार्षिकांकास गोंडवाना विद्यापीठाचा द्वितीय पुरस्कार

Gadchiroli news | मृदगंधला मिळालेला हा सलग पाचवा पुरस्कार
Munghate College  Mridgandh annual magazine
कुरखेडा येथील श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या ‘मृदगंध’ वार्षिकांकास गोंडवाना विद्यापीठाचा द्वितीय पुरस्कार मिळाला.Pudhari Photo
Published on
Updated on

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित कुरखेडा येथील श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या ‘मृदगंध’ वार्षिकांकास गोंडवाना विद्यापीठाचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. मृदगंधला मिळालेला हा सलग पाचवा पुरस्कार आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापनदिन समारंभात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे,मृदगंध वार्षिकांकाचे मुख्य संपादक डॉ. रवींद्र विखार, डॉ.दशरथ आदे, डॉ.भास्कर तुपटे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी पुरस्कार स्वीकारला. प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, माजी कुलगुरू डॉ. विजय आईचवार, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानद्वारे आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा २०२१ चा सर्वात्कृष्ट वार्षिकांकाचा प्रथम पुरस्कारसुद्धा मृदगंधला प्राप्त झाला आहे.

शिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनेकदा मृदगंधला प्रथम, तर गोंडवाना विद्यापीठाने स्थापनेपासूनच अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

हा वार्षिकांक ‘कृत्रिम बुद्धिमत्ता: आव्हाने व संधी’ यावर आधारित आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?, कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक, कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे समाज जीवनावर पडलेले प्रभाव, चंद्रयान, आंतरराष्ट्रीय उंट वर्षा निमित्त उंटावर आधारित लेख आदींचा समावेश आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात मुख्य संपादक डॉ. रवींद्र विखार, प्रा.डॉ.दशरथ आदे, प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर,प्रा.भास्कर तृपटे, प्रा.डॉ.गुणवंत वडपल्लीवार, आशिष बगमारे, सतीश मुनघाटे, कल्याणी उईके, ओमप्रकाश गोबाडे यांनी वार्षिकांकाचे संपादन केले आहे.

Munghate College  Mridgandh annual magazine
गडचिरोली: ४ ऑक्टोबरला ढिवर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news