Sonsari Ashram School Student Death Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Student Death | सोनसरी आश्रमशाळा विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण : अधीक्षिकेच्या निलंबनाचे आदेश

मंत्री डॉ. अशोक उईके यांनी चौकशी करून संबंधित अधीक्षिकेला तत्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत

पुढारी वृत्तसेवा

Sonsari Ashram School Student Death

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील आठवी वर्गात शिकणारी रानू कृष्णा हलामी या १४ वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहातच गळफास घेतला. याप्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे तसेच संबंधित अधीक्षिकेला तत्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आज डॉ. उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना अनुग्रह अनुदान म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. उईके यांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनेच्या अनुषंगाने संबंधितांची जबाबदारी तपासून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही डॉ. उईके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. आश्रमशाळांतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक-अधीक्षिकांशी नियमित संवाद व संपर्क ठेवून शाळा आणि वसतिगृहांतील परिस्थितीची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

यापुढे आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ.उईके यांनी दिला.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम., माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, चांगदेव फाये व संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT