Maharashtra Police Pudhari News Network
गडचिरोली

Gadchiroli news | उपविभागीय अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

जिल्हृयातील जवळपास सर्वच एसडीपीओंचे जिल्हृयाबाहेर स्थानांतरण करण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली : राज्य शासनाने मंगळवारी(ता.२३) राज्यातील ११५ पोलिस उपअधीक्षक(DYSP) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गडचिरोली जिल्हृयातील जवळपास सर्वच एसडीपीओंचे जिल्हृयाबाहेर स्थानांतरण करण्यात आले आहे.

सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांची सांगली जिल्हृयातील मिरज येथे बदली करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील समाधान पाटील हे सिरोंचाचे नवे एसडीपीओ असतील. अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांचे नवी मुंबई येथे, तर हेडरीचे एसडीपीओ योगेश रांजणकर यांचे पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त पदावर स्थानांतरण झाले आहे. एटापल्लीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांची बारामती उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांची पुण्यातील शिरुर येथे बदली करण्यात आली आहे. घोटचे एसडीपीओ जगदीश पांडे यांचे अकोला येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात स्थानांतरण झाले आहे. धानोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांना सोलापूर ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे. पोलिस उपअधीक्षक(अभियान) विशाल नागरगोजे यांना ठाणे जिल्हृयातील शहापूर उपविभागात नियुक्त करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT