गडचिरोली : सोसायटी फॉर एज्युकेशन,ॲक्शन अँड रिसर्चच्या (सर्च) संचालकपदी प्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय व डॉ.राणी बंग यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ.आनंद, तर ‘निर्माण’च्या संचालकपदी कनिष्ठ पुत्र अमृत बंग यांची निवड करण्यात आली.
डॉ.अभय आणि डॉ. राणी बंग यांनी १९८६ ला स्थापन केलेल्या ‘सर्च’ने लोकसहभागातून आरोग्यसेवा आणि संशोधन यातून जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये डॉ.अभय बंग यांचा ७५ वा, तर डॉ.राणी बंग यांचा ७४ वा वाढदिवस ‘सर्च’मध्ये साजरा झाला होता. त्यावेळी दोघांनीही ‘सर्च’च्या दैनंदिन जबाबदारीतून निवृत्ती घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानंतर ‘सर्च’च्या प्रशासक मंडळाने डॉ.आनंद यांची ‘सर्च’च्या, तर अमृत यांची ‘निर्माण’च्या संचालकपदी निवड केली. ‘सर्च’मध्ये बुधवारी झालेल्या कार्यक्रमात डॉ.आनंद आणि अमृत यांनी त्यांच्या पदांची सुत्रे स्वीकारली. मात्र, डॉ.अभय व डॉ.राणी बंग हे यापुढेही मार्गदर्शक आणि संस्थापक ट्रस्टी म्हणून सर्चमध्ये कार्यरत असतील. डॉ.अभय बंग संचालक मंडळाचे अध्यक्षही असतील.

याप्रसंगी डॉ.अभय बंग म्हणाले, “१९८६ मध्ये गडचिरोलीला कार्यक्षेत्र म्हणून निवडले. सेवा, संशोधन आणि देशाच्या आरोग्यसुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी थोडा हातभार लावावा, असा विचार करून सर्चची स्थापना झाली. ‘सर्च’च्या नव्या नेतृत्वाने भूतकाळाचे ओझे न बाळगता काळानुसार कार्यक्रम बदलले पाहिजे.” गडचिरोलीचे लोक म्हणजे आपली जमीन आहे. त्यांच्यापासून दूर न जाता, विज्ञानाचा वापर करून आरोग्य आणि युवकांसाठीच्या सत्याचा शोध; आणि महात्मा गांधीजींपासून येणारी ‘सर्च’ची मूल्ये आणि नैतिक विचार, ही त्रिसूत्री ‘सर्च’ आणि नव्या नेतृत्त्वाला सतत मार्गदर्शन करेल, असेही डॉ.बंग म्हणाले.
डॉ.राणी बंग म्हणाल्या, “आपल्या संघटनेत कोणी मोठा किंवा छोटा असा भेद नाही. संघटनेतील ऐक्य ही ‘सर्च’ची शक्ती आहे. सर्वांचे ऐका आणि कोणत्याही स्थितीत सत्याची कास सोडायची नाही.” डॉ.आनंद म्हणाले की, आजच्या दिवशी माझ्या मनात कृतज्ञता आणि जबाबदारीची जाणीव या दोन भावना आहेत. ‘सर्च’ची मूल्ये आणि नवी जबाबदारी यांच्या पूर्तीसाठी पूर्णपणे प्रयत्नरत राहीन. अमृत बंग म्हणाले की, सर्चचा वारसा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण जे काही करू ते देशातील सर्वोत्तम असले पाहिजे. नवनिर्मिती आणि काळाची आव्हाने यांना आपण समोर जाऊ. ‘सर्च’चे सहसंचालक तुषार खोरगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले.