Sexual Assault Case  File Photo
गडचिरोली

Gadchiroli Crime | व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी केले प्रपोज, मग लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार: तरुणाला अटक

'तू मला खूप आवडतेस', असे म्हणून अजयने तिला प्रपोज केले

पुढारी वृत्तसेवा

Sexual Assault case Gadchiroli

गडचिरोली : 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी अल्पवयीन मुलीला प्रपोज केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकास कोरची पोलिसांनी अटक केली आहे. अजय टिल्लू कल्लो (वय २५, रा.जांभळी, ता. कोरची) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत हकीकत अशी की, अजय कल्लो हा 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी १४ फेब्रुवारी २०२५ ला १७ वर्षीय पीडित मुलीला भेटला. 'तू मला खूप आवडतेस', असे म्हणून अजयने तिला प्रपोज केले. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून तिला विश्वासात घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अनेकदा तो लग्नाचे आमिष दाखवून १० मार्च २०२६ पर्यंत तिच्यावर अत्याचार करीत राहिला.

यामुळे ती ३ महिन्यांची गर्भवती झाली. त्यानंतर तिने कोरची पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दिलेल्या वैद्यकीय अहवालात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी ११ मार्चला आरोपी अजय कल्लो यास भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (एम), ६४ (२) (आय), सहकलम पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT