Amey Poreddiwar Passes Away Pudhari
गडचिरोली

Gadchiroli News | गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पोरेड्डीवार यांना पुत्रशोक

अमेय पोरेड्डीवार यांच्या अकाली निधनाने गडचिरोलीत शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Amey Poreddiwar Passes Away

गडचिरोली : येथील नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश पोरेड्डीवार व निवृत्त प्राचार्य कविता पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय पोरेड्डीवार (वय ३७) यांचे मंगळवारी (दि.१६) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

अमेय पोरेड्डीवार हे आज सकाळी आपल्या निवासस्थानी नाश्ता करीत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पुणे येथून माध्यम क्षेत्रातील पदव्युतर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही काळ या क्षेत्रात काम केले. त्यानंतर त्यांनी नागपुरात बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवले. शांत, मृदुभाषी व हसतमुख अशी ओळख असलेल्या अमेय यांच्या अकाली निधनाबद्दल जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमेय पोरेड्डीवार यांच्या पश्चात पत्नी, वडील सुरेश पोरेड्डीवार, आई प्राचार्य कविता पोरेड्डीवार, विवाहित बहीण आणि मोठा आप्त परिवार आहे. अमेय यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT