प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम Pudhari
गडचिरोली

Gadchiroli Student Death | अकरावीतील विद्यार्थ्याने आश्रमशाळेच्या वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपविले

चामोर्शी मार्गावरील वाकडी गावानजीकच्या आश्रमशाळेतील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Ashram school hostel Class 11 student death

गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील वाकडी गावानजीकच्या एकलव्य आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो चामोर्शी तालुक्यातील शांतीनगर येथील रहिवासी होता.

प्राप्त माहितीनुसार, प्रिन्स मेश्राम हा एकलव्य आश्रम शाळेच्या वसतिगृहात राहून अकराव्या वर्गात शिक्षण घेत होता. सोमवारी संध्याकाळी सुमारे ६:२० वाजताच्या सुमारास तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृताची आई ही शिक्षिका असून प्रिन्स हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शांतिनगरसह परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांसह स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. आश्रम शाळेसारख्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामागील नेमके कारण शोधणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, ही घटना घडल्यानंतर कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे आश्रम शाळेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT