Gadchiroli boy drowns
गडचिरोली : नजीकच्या बोरमाळा नदीघाटावर बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
कार्तिक ज्ञानेश्वर सोमनकर(१५) असे मृत युवकाचे नाव असून, तो गडचिरोली शहरातील हनुमान वॉर्डातील रहिवासी होता. कार्तिक सोमनकर हा आज सकाळी काही मित्रांसमवेत वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर बैल धुण्यासाठी गेला होता. इतर जण एका बाजूला बैल धूत होते, तर कार्तिक हा बैलाची शेपटी पकडून दुसऱ्या बाजूच्या पाण्यात जात होता. मात्र कार्तिकने हात सोडल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
सोबत असलेल्या मित्रांना पोहता येत नसल्याने ते कार्तिकला वाचवू शकले नाही. काही वेळानंतर नागरिकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.