Accident News file photo
गडचिरोली

Gadchiroli Accident | आष्टी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार

अनखोडा येथून दुचाकीने आष्टीकडे जाताना दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Ashti Accident News

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे आज दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले.

राजू येलमुले आणि त्यांचा मुलगा संदीप येलमुले हे अनखोडा येथून दुचाकीने आष्टीकडे जात होते, तर शाम बिस्वास हे दुचाकीने आष्टी येथून आपल्या गावाकडे जात होते.

चामोर्शी मार्गावरील एचपी पेट्रोलपंपासमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात राजू येलमुले आणि श्याम बिस्वास यांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप येलमुले हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आष्टीचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT