Amit Timma Death
मरपल्ली (ता. एटापल्ली) येथील अमित तिम्मा (वय २९) याचा बुडून मृत्यू झाला.  Pudhari News Network
गडचिरोली

गडचिरोली : डुम्मे नाल्यात बुडून आणखी एका तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील युवकाचा डुम्मे नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चोवीस तासांतच तोडसा येथील आणखी एका युवकाचा त्याच नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१०) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अमित डोलू तिम्मा (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. दरम्यान, अमितचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

Summary

  • मरपल्ली येथील युवकाचा डुम्मे नाल्यात बुडून मृत्यू

  • अमितचा मृतदेह डुम्मे नाल्यात तरंगताना आढळला

  • अमितचा मृत्यू संशयास्पद, घातपाताचा प्रकार

अक्षय कुळयेटी डुम्मे नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता.

मरपल्ली येथील अक्षय कुळयेटी हा सोमवारी (दि. ८) रात्री दहाच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसह डुम्मे नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. परंतु, मासे पकडण्यासाठी जाळे टाकताना तोल गेल्याने अक्षय पाण्यात पडला. मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावरील एका बंधाऱ्यात अक्षयचा मृतदेह अडकलेला आढळून आला. या घटनेला चोवीस तास उलटण्याआधीच तोडसा येथील अमित तिम्मा या युवकाचाही त्याच नाल्यात बुडून मृत्यू झाला.

अमितचा मृतदेह डुम्मे नाल्यात तरंगताना आढळला.

अमित तिम्मा हा मंगळवारी सकाळी एटापल्लीला जातो, असे सांगून घरुन निघून गेला. परंतु, रात्रीपर्यंत तो घरी परतलाच नाही. आज सकाळी मरपल्ली येथील नागरिकांना अमितचा मृतदेह डुम्मे नाल्यात तरंगताना आढळला. एटापल्ली पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. दरम्यान, अमितचा मृत्यू संशयास्पद असून, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यकत केली आहे

SCROLL FOR NEXT