गडचिरोली : अखेर वाहून गेलेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला

मरपल्ली येथील नाल्यावर मासेमारी करताना घडली होती घटना
The body of the drowned youth was found
मासेमारी दरम्यान तरूण वाहून गेला होता.Pudhari News Network
Published on
Updated on

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील नाल्यावर मासेमारी करताना वाहून गेलेल्या एका युवकाचा मृतदेह आज (दि.९) दुपारी सापडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अक्षय पांडू कुळयेटी (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे.

The body of the drowned youth was found
छत्रपती संभाजीनगर : शेवगावच्या तरूणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू

अक्षय कुळयेटी हा सोमवारी (दि.८) रात्री दहा वाजताच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसह डुम्मे नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. परंतु मासे पकडण्यासाठी जाळे टाकताना तोल गेल्याने अक्षय पाण्यात पडला. दोन्ही सहकाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधार असल्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि अक्षय पाहता पाहता दिसेनासा झाला. दोघांनी गावात येऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते प्रज्वल नागुलवार, अर्जुन सिडाम, ईश्वर गावडे, ब्रम्हा रापंजी, माधव हलामी, सूरज लेकामी, देवराव लेकामी, संजय वड्डे, कालिदास मितलामी, कोत्तू रापंजी, फकरी रापंजी यांच्यासह अन्य गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु अक्षय सापडला नाही. आज पुन्हा त्यांनी शोध मोहीम राबविली असता मंगळावारी (दि.९) दुपारी चारच्या सुमारास घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावरील एका बंधाऱ्यात अक्षयचा मृतदेह अडकलेला आढळून आला. एटापल्ली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news