court fined the deputy sarpanch who sent obscene messages to the woman
महिलेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या उपसरपंचाला कोर्टाने ठोठावला दंड File Photo
गडचिरोली

गडचिरोली : उपसरपंच पाठवत होता महिलेला अश्लील मेसेज, कोर्टाने ठोठावला ५ हजार रुपयांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

गडचिरोली ;  गावातील महिलेशी नेहमी फोनवर अश्लील बोलून तिला मेसेज पाठविणाऱ्या एका उपसरपंचास अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. धर्मय्या किष्टय्या वडलाकोंडा (४३), रा.असरअली, ता.सिरोंचा असे शिक्षा झालेल्या दोषी उपसरपंचाचे नाव आहे.

धर्मय्या वडलाकोंडा हा नेहमी पीडित महिलेच्या घरी जायचा. शिवाय तिच्याशी फोनवर अश्लिल संभाषण करुन तिला अश्लिल मेसेजेसही पाठवायचा. धर्मय्याचे हे कृत्य न आवडल्याने महिलेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पतीने धर्मय्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. मात्र, धर्मय्याने शिवीगाळ करुन ‘तुला काय करायचे ते करुन घे’, असे धमकावले.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर धर्मय्याच्या पत्नीने पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने धर्मय्याविरुद्ध कायदेशिर तक्रार केली. त्यानुसार असरअली पोलिसांनी संशयीत आरोपी धर्मय्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी पवार व गजानन राठोड यांनी अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात संशयीत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

२१ जूनला या प्रकरणाचा निकाल लागला. न्यायालयाने फिर्यार्दी व साक्षदारांचा पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी धर्मय्या वडलाकोंडा यास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय यापुढील तीन वर्षे असे कृत्य करणार नाही, असे हमीपत्रही लिहून घेतले. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.

SCROLL FOR NEXT