विदर्भ

भंडारा: कर्तव्यात कसूर भोवली; जिल्हा पणन अधिकारी निलंबित

अविनाश सुतार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील धान घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यास कसूर केल्याप्रकरणी जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांना निलंबित करण्यात आले होते.

जिल्ह्यातील आठ संस्थांनी धान खरेदी करताना अनियमिततेमुळे पणन महासंघाला २८ कोटी ३९ लाख रुपयांचा फटका बसल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार जिल्हा पणन अधिकारी खर्चे यांच्या कार्यकाळातला असला तरी त्यांनी संस्थांवर कारवाई केली नाही. माहिती असतानाही खुलासा दिला नाही. संस्थांनी धान खरेदी केल्यानंतर तो प्रत्यक्ष भरडाईसाठी देताना घट आल्याचे दिसून आले. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालावरून जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांना निलंबित करण्यात आले. त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT