१९८०पासून पाणवठा आधारित प्राणी गणनेची पद्धत सुरू झाली आहे.  (Canva Photo)
चंद्रपूर

Water Hole Wildlife Census | पाणवठा आधारित प्राणी गणना बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच का करतात ? ही पद्धत कुणी अंमलात आणली? जाणून घ्या

१९८० च्या दशकांपासून सुरू आहे पाणवठा आधारित प्राणी गणनेची पद्धत (वॉटर हॉल सिटिंग)

पुढारी वृत्तसेवा

Buddha Purnima Wildlife Survey

चंद्रपूर : राज्यातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट, ताडोबा-अंधारी, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा, बोर व  पेंच व्याघ्र प्रकल्प आहेत.  शिवाय अन्य छोटे प्रकल्प आहेत. या सर्वच व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मनुष्यबळाद्वारे पाणवठा आधारित प्राणी गणनेची पद्धत (वॉटर हॉल सिटिंग) 1980 च्या दशकांपासून सुरू आहे. ही पद्धत काय आहे, काय फायदे आहेत. ही पद्धत कुणी अंमलात आणली. या विषयी बुद्ध पौर्णिमेच्या प्राणी अवघे काही तास उरले असताना  ह्या पद्धती विषयी घेतलेली माहिती.

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मनुष्यबळाद्वारे  वन्य प्राणी गणनेची परंपरा भारतात मैसूरचे महाराज आणि नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुरू केली. ही प्रक्रिया मुख्यतः कर्नाटकमधील नागरहोळे आणि बांदीपूर अभयारण्यात सुरू झाली होती. त्या काळात पूर्ण चंद्रप्रकाशात (बुद्ध पौर्णिमा) प्राणी स्पष्टपणे दिसतात, त्यामुळे ही वेळ प्राणी मोजणीसाठी उपयुक्त समजली जात होती.

नंतर या परंपरेचा उपयोग इतर अभयारण्यातही करण्यात आला आणि वन विभागानेही ही पद्धत स्वीकारली. तेव्हापर्यंत वैज्ञानिक गणनेच्या (जसे की कॅमेरा ट्रॅप, डीएनए अॅनालिसिस इ.) पद्धती लागू झाल्या नव्हत्या.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात  पाणवठा आधारित प्राणी गणनेची पद्धत म्हणजेच "वॉटर हॉल सिटिंग" १९८० च्या दशकापासून वापरात आहे. तेव्हापासूनच ही पद्धत संपूर्ण भारतात अनेक व्याघ्र प्रकल्पांत वापरली जात आहे. ताडोबामध्ये ती दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला नियमितपणे पार पडते.

महाराष्ट्रात सध्या ६ प्रमुख व्याघ्र  प्रकल्प असेच अन्य छोटे प्रकल्प  आहेत,. यामध्ये  मेळघाट  व्याघ्र प्रकल्प (1974), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (1993),  सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (2007), नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (2013), बोर व्याघ्र प्रकल्प (2014), पेंच व्याघ्र प्रकल्प (महाराष्ट्र भाग) (1998) आदींचा समावेश आहे.

पाणवठा आधारित प्राणी गणनेची पद्धत म्हणजेच "वॉटर हॉल सिटिंग" होय. १९८० च्या दशकापासून सुरू करण्यात आलेल्या पद्धतीनुसार दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना नियमितपणे पार पडते.

ही पद्धत का सुरू करण्यात आली?

1) उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते, त्यामुळे सर्व प्राणी पाणवठ्यांवर नियमित येतात. या वेळी प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनाचा अभ्यास,  त्यांचे निरीक्षण करणे सोपे होते.

2. बुद्ध पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो, त्यामुळे संध्याकाळी आणि रात्रीही प्राणी दिसू शकतात. प्रखर प्रकाशाविना निरीक्षण करण्यासाठी चंद्रप्रकाशाचा उपयोग होतो.

3. वाघ, बिबट्या, हरणे, अस्वल, वानर, जंगली डुक्कर, लांडगा अशा सर्व प्रजातींच्या उपस्थितीचा, संख्येचा आणि वर्तनाचा मूल्यवान डेटा संकलन करता येतो. वन्यजीवांची घनता, हालचाल आणि त्यांच्या साखळीतील स्थान समजणे सोपे जाते

4. वन्यजीव व्यवस्थापनासाठी मदत होते.

जंगल संवर्धनाचे नियोजन करणे सोपे जाते.

मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता ओळखता येते.

5. स्वयंसेवक, निसर्गप्रेमी आणि नागरिक यात सहभागी होऊन जंगल संवर्धनाशी जोडले जातात.त्यामुळे लोकांमध्ये जंगलाबाबत जागरूकता आणि आपुलकी निर्माण होते.जनसामान्यांचा सहभाग वाढतो.

पूर्वी ही पद्धत अधिक प्राथमिक होती.  फक्त मनुष्यबळावर निरीक्षणावर आधारित होती. आता तर व्याघ्र प्रकल्पात GPS, GIS, डिजिटल नोंदी, कॅमेरा ट्रॅप्स यांचा वापर वाढला आहे, पण पाणवठा पद्धत अजूनही विश्वसनीय आणि महत्त्वाची मानली जाते.

वनविभाग आणि व्यवस्थापन पातळीवर या प्राणी गणनेतून अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जातात.

पाणवठा आधारित प्राणी गणनेतून (Water Hole Census) मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभाग आणि व्यवस्थापन पातळीवर अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जातात. या उपाययोजनांचा उद्देश म्हणजे जंगलाचा समतोल राखणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे आहे.

पाणवठ्यांची संख्या आणि व्यवस्था वाढवणेः

ज्या भागात प्राणी अधिक संख्येने दिसतात पण पाणीटंचाई आहे, तिथे नवीन कृत्रिम पाणवठे निर्माण केले जातात. विद्यमान पाणवठ्यांची स्वच्छता, दुरुस्ती केली जाते. काही ठिकाणी सौर पंप किंवा विहिरींच्या माध्यमातून पाणी भरण्याची सोय होते.

गस्त आणि संरक्षणात सुधारणा 

वाघ किंवा बिबट्यांचे हालचाली अधिक असलेल्या भागांमध्ये पेट्रोलिंग वाढवले जाते. कॅमेरा ट्रॅप, GPS कॉलर वापरून विशिष्ट प्राण्यांवर लक्ष ठेवले जाते.

बनवटी शिकार रोखण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवली जाते.

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय 

ज्या भागात प्राणी वारंवार जंगलाच्या बाहेर दिसतात, त्या गावांमध्ये अलर्ट सिस्टम, बांबू कुंपण, बायो फेन्सिंग केली जाते. गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवल्या जातात.

जंगल व्यवस्थापनाचे नियोजन 

वन्यजीवांची घनता लक्षात घेऊन कोअर आणि बफर क्षेत्राचे व्यवस्थापन पुन्हा आखले जाते.

काही वेळा स्थानिक प्रजातींचे पुनर्संस्थापन  केले जाते.

झाडे, गवत, झुडपे यांचे व्यवस्थापन नैसर्गिकरित्या केल्या जाते. प्राणी जास्त दिसणाऱ्या क्षेत्रात पर्यटन नियंत्रित केले जाते.

प्रवासी मार्गदर्शन आणि पर्यटनाचे नियमन 

प्राणी जास्त दिसणाऱ्या क्षेत्रात पर्यटन नियंत्रित केले जाते. विश्रांती कालावधीमध्ये काही क्षेत्रे पर्यटनासाठी बंद ठेवली जातात. वन्यजीवांना त्रास होणार नाही अशा प्रकारे सफारी मार्गांचे पुनर्नियोजन केले जाते.

ह्या उपाययोजना वन्यजीवांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी खूप महत्वाच्या मानल्या जाता.

सध्या राज्यातील प्रमुख प्रकल्पाचा छोटे प्रकल्पही अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. तरीही ब्रिटिश काळात सरू झालेल्या पानवट आधारित मनुष्यबळाद्वारे होणाऱ्या या वन्य प्राणी करण्याची महती आणि विश्वासहार्यता अजूनही टिकून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT