श्रीमती पाटील यांनी निवडणूक यंत्रणा तसेच नोडल अधिका-यांनी केलेल्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. Pudhari
चंद्रपूर

MLC Election | वर्धा–चंद्रपूर – गडचिरोली विधान परिषद निवडणूक : निवडणूक निरीक्षकांकडून पूर्व तयारीचा आढावा

वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Poll Observer Review Meeting

चंद्रपूर : वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून स्वाती म्हसे पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने श्रीमती पाटील यांनी मंगळवारी (दि.2) निवडणूक यंत्रणा तसेच नोडल अधिका-यांनी केलेल्या पूर्व तयारीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती पाटील यांनी, सर्व नोडल अधिका-यांनी केलेल्या कामांची माहिती जाणून घेतली. तसेच निवडणुकीचे काम सर्वांनी अतिशय गांभिर्याने करावे. यात कोणतीही चूक होऊ देऊ नका. मतदान पत्रिका, मतदान पेट्या व इतर साहित्यांचे वाटप, वाहतूक अतिशय काळजीपूर्वक करावी. अशा सुचना दिल्या. तत्पुर्वी त्यांनी चंद्रपूर तहसील कार्यालय येथे होणा-या मतदान केंद्राची तसेच मतमोजणी कक्षाची पाहणीसुध्दा केली.

सादरीकरणातून जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरीता एकूण 975 मतदार असून यात पुरुष मतदार 495 तर स्त्री मतदार 480 आहेत. सदर मतदार संघात चंद्रपूर जिल्ह्यातील 1 महानगरपालिका, 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायती, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायती तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचा समावेश आहे. तिनही जिल्ह्यातील जिल्ह परिषदांच्या मतदारांची संख्या शुन्य आहे. तिनही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय असे एकूण 17 मतदान केंद्र राहणार असून मतमोजणी चंद्रपूर येथील तहसील कार्यालयात होणार आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा नोडल अधिकारी सर्वश्री विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी संजय पवार, अतुल जटाळे, शुभम दांडेकर, सचिन कुमावत, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, अपर पोलिस अधिक्षक कार्तिक, वर्धाचे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, अतिरिक्त् पोलिस अधिक्षक संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान, उमेदवार /पक्ष किंवा मतदारांना निवडणूक निरीक्षक स्वाती म्हसे पाटील (मो. 9307181736) यांना भेटायचे असल्यास त्या, बकुळ, व्हीआयपी गेस्ट हाऊस, वन अकादमी, चंद्रपूर येथे सकाळी 11 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT