तांदळाचे कट्टे वाहतूक करणाऱ्या ट्रकने उभ्या कबाडीच्या ट्रकला जोराची धडक दिली.  Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपूर : ट्रकच्या धडकेत ट्रक मटण मार्केटमध्ये घुसला; कामगार ठार, चालक जखमी

Chandrapur Accident | तळोधीतील शिवाजी चौकात घटना

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर वरून तांदळाचे कट्टे वाहतूक करणाऱ्या ट्रकने उभ्या कबाडीच्या ट्रकला जोराची धडक दिली. त्यामुळे मटण मार्केटमधील ट्रक घुसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (दि.१५) सकाळी सहाच्या सुमारास नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) शहरातील शिवाजी चौकाजवळ घडली. माधव नामदेव मांढरे (वय 35) असे मृत कामगाराचे नाव आहे. तो तळोधी (बा.) येथील रहिवासी होता. ट्रक चालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथून (एमएच 40 वाय 2990) ट्रक मूल येथे तांदूळ घेऊन निघाला होता. सकाळी सहाच्या सुमारास नागपूर चंद्रपूर मार्गावरील नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे शिवाजी चौकाजवळ कबाडी सामान भरलेला ट्रक उभा होता. तर तिथेच जवळ अन्य एक खाली ट्रक उभा होता. तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकने कबाडी सामान भरलेल्या (एम. एच. 32 क्यू 5374) ट्रकला जोराची धडक दिली. त्यामुळे ट्रकमधील तांदूळाचे कट्टे रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले. तर धडकेमुळे उभा असलेला ट्रक 50 मीटर पर्यंत मागे सरकल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेला किशोर कटारे यांच्या मटण दुकानावर जाऊन आदळला.

या दुकानावर काम करणारा माधव मांढरे याला जबर धडक बसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलिसांनी चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात जखमींना हलविले. उपचारादरम्यान माधव मांढरे याचे निधन झाले. याबाबत ट्रक चालक रामेश्वर टेकचंद ठाकरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चालकही जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT