चिचपल्ली परिक्षेत्रात टी 83 वाघिणीला वनविभागाने जेरबंद केले.  Pudhari Photo
चंद्रपूर

चौघांचा जीव घेणारी नरभक्षक वाघीण जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून मुल तालुक्यातील शेतशिवारात दहशत घालून चौघांचा बळी घेणारी टी 83 वाघिणीला वनविभागाने जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. वाघिण जेरबंद झाल्याने तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, गुराख्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

चंद्रपूर वनविभागातील मुल उपक्षेत्रा अंतर्गत जानाळा, कांतापेठ, चिरोली, कवडपेठ, चिचाळा, ताडाळा परिसरातील मानव -वन्यजीव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन शेतकरी शेतमजूर, नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. मागील काही दिवसांत जंगलालगतच्या शेतशिवारात चौघांचा जीव घेतला होता. त्यामुळे या गावांमध्ये प्रचंड दशहत निर्माण होऊन वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असताना वनविभागाने वाघिणीला जेरबदं करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

चंद्रपूर वनविभागांतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 717 मध्ये आज (दि.२८) टी 83 वाघिणीला जेरबंद करण्यात आले. त्यामुळे जानाळा, कांतापेठ, चिरोली, कवडपेठ, चिचाळा, ताडाळा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. शार्प शूटर अजय मराठे यांनी वाघिणीला बेशुध्द केले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व त्यांच्या चमुने वाघिणीवर उपचार केले. या वाघिणीने आता पर्यंत जंगलालगतच्या शेतशिवारात काम करणाऱ्या चौघांचा जीव घेतला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT