Tiger Attack File Photo
चंद्रपूर

Tiger Attack in Chandrapur: पळसगाव (जाट) शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पळसगाव (जाट) येथील शेतशिवारात तिळ कापणीसाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने भीषण हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली.

मोहन कारंडे

Tiger Attack in Chandrapur

चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पळसगाव (जाट) येथील शेतशिवारात तिळ कापणीसाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने भीषण हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.

नानाजी नारायण कामडी (वय ५५)  रा. पळसगाव जाट असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नानाजी कामडी हे शनिवारी आपल्या शेतात तिळ कापणीच्या कामासाठी गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी कापलेला तिळ घरी आणून दिला आणि ते पुन्हा शेताकडे गेले. सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. सायंकाळच्या सुमारास शेतात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांच्या शरीरावरील जखमांवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यातच झाल्याचे स्पष्ट झाले.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत नानाजी कामडी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे. कुटुंबियांचा मुख्य आधार हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्या २ ते ३ दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर आहे.  या संदर्भात गावकऱ्यांनी वनविभागाला पूर्वकल्पना दिली होती. मात्र, या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाल्याचा या 4आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मानवी जीवनाला धोका ठरणाऱ्या या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT