चंद्रपूर

मी फक्त विकासाचं राजकारण करतो : सुधीर मुनगंटीवार

दिनेश चोरगे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मी फक्त विकासाचं राजकारण करतो, जाती-पातीचं राजकारण उभ्या आयुष्यात माझ्याकडून झाले नाही. मी तीनशेच्यावर विकासकामे केली आहेत. त्याची यादी तुमच्यासमोर वाचून दाखवितो, पण विरोधकांनी त्यांच्या काळात २१ विकासकामे केली आहेत का? हे जनतेला त्यांनी सांगावं, असे म्हणत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार जाहीर सभेत विरोधकांवर निशाणा साधला.

राजुरा विधानसभा मतदार संघात गुरुवारी (दि.११) त्यांनी झंझावाती प्रचारदौरा केला. यावेळी त्यांनी अनेक गावांमध्ये जाहीर सभा, प्रचार यात्रा घेऊन खेड्यापाड्यातील गावांना भेटी दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, जनतेसमोर मी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करत आहे. पण माझे प्रतिस्पर्धी विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. मागील पाच वर्षात राजुरा विधानसभा मतदार संघाचा विकास रखडला आहे. नागरिकांना जाण्या-येण्यासाठी साधे रस्ते करता आले नाहीत, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. या भागात पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल मी लोकसभेत निवडून आल्यानंतर तातडीने मार्गी लावणार, पण त्यासाठी मला निवडून द्यायला पाहिजे, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

ना. मुनगंटीवार यांनी सास्ती, तोहगाव, लाठी, धाबा आदि ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. तर गोवरी, चुनाळा, विरूर, चकदरूर, भंगाराम तळोधी, विठ्ठलवाडा, वढोली, खरारपेठ आदि ठिकाणी प्रचार यात्रा घेतल्या. तसेच गोवरी, माथरा, रामपूर, विहीरगाव, मूर्ती, नलफ़डी, सिंधी, धानोरा, धानापूर, करंजी, आक्सापुर, सरांडी, सोनापूर देशपांडे, सकमुर, दरुर, चकपारगाव, खराळपेठ आदि गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेतले. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, बंडू हजारे, सुरेश धोटे, सुरेश रागीट, मधुकर नरड, सुनील उरकुडे, सुभाष बोनगिरवार, सचिन शेंडे, अरुण लोखंडे, सरपंच सुचिता मावलीकर, प्रतीक चन्ने, जिल्हा परिषद सदस्य स्वाती वडपल्लीवार, गणेश पिसे, महेंद्र बोबडे, प्रवीण मुनगंटीवार, विपुल भडी, गजानन झाडे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT