Maharashtra Local Body Elections
चंद्रपूर : महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील नियम १७ (१) (ब) नुसार आवश्यक कार्यवाही न झाल्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी काही जागांसाठीची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
१) घुग्घुस नगर परिषद (अध्यक्ष व सर्व सदस्य)
२) गडचांदूर नगर परिषद जागा क्र. ८-ब सर्वसाधारण (महिला),
३) मूल नगर परिषद जागा क्र. १०-ब (सर्वसाधारण)
४) बल्लारपूर नगर परिषद जागा क्र. ९-अ (ना.मा.प्र.)
५) वरोरा नगर परिषद जागा क्र. ७-ब ( सर्वसाधारण)
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०२५, दुपारी ३.०० वाजेपर्यंत,चिन्हवाटप व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी : ११ डिसेंबर २०२५,
मतदान (आवश्यक असल्यास) : २० डिसेंबर २०२५, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०, मतमोजणी व निकाल जाहीर : २१ डिसेंबर २०२५ सकाळी १०.०० वाजतापासून शासन राजपत्रात निकाल प्रसिद्धी : २३ डिसेंबर २०२५ पूर्वी (कलम १९ अन्वये) करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी दिली आहे.