चंद्रपुरातील बिनबागेट परिसरातमध्ये टोळीयुद्धातून कुख्यात गुंड हाजी सरवर शेख सहा याला सहा जणांनी गोळ्या झाडल्या त्यानंतर चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिले गेले. ही गंभीर बाब असून गुन्हेगारांना राजकीय नेतृत्वाने पाठीशी घालू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. गुन्हेगारी टोळ्या व गुंडांच्या मदतीसाठी पोलीस ठाण्यात येणारे राजकीय नेत्यांचे कॉल्स प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या. गुन्हेगारीचा हा कॅन्सर पुढच्या टप्प्यात जाऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूरात जुलै महिन्यापासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र सुरू आहे, शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने अशांती पसरली आहे, आता शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हे सहज घडत आहे, पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित करण्याबाबत अपयशी ठरला आहे. 2 दिवसांपूर्वी कुख्यात गुंड हाजी सरवर शेख यांची बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे 6 जणांनी मिळून गोळ्या झाडत हत्या केली. 6 युवक चंद्रपुरात 4 बंदुका घेऊन शहरात फिरत असताना पोलीसांना याबाबत थांगपत्ता का लागला नाही? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या गोळीबाराच्या घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहे, चंद्रपूर शहरात 2, राजुरा व बल्लारपूर येथे प्रत्येकी 1 घटना घडली असून आतापर्यंत टोळी युद्धातून दोघांनी जीव गमावला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना रोखण्यास पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी राजू झोडे यांची केली. गोलीबाराच्या या घटनेने जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला, असून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी झाले असून सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस नेते राजू झोडे यांनी केली आहे.