बोगस मतदार नोंदणी  Pudhari Photo
चंद्रपूर

कोरपना तालुक्यात 62 बुथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : कोरपना शहरात व तालुक्यात ग्रामीण भागातील 52 गावातील एकूण 62 बुथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येते. यात यादव, परमार, पांडे अशी नावे आहेत. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे. गेल्या 10 ऑक्टोंबर पर्यंत कोरपना तालुक्यात 3 हजार बोगस मतदार असल्याचं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बोगस नोंदणी कशी उघड झाली?

मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री 12.00 वाजताच्या नंतर भरण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

चौकशी करून कारवाई करावी :

मी दोनवेळा लखमापूर ग्रामपंचायतीची उपसरपंच आहे. मात्र 328 नवे मतदार एकच वेळेस नोंदणी झालेली. ही पहिली वेळ आहे. ते मतदार माझ्या गावात राहत नाहीत, हे सर्व बोगस मतदार आहे. याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लखमापूर ग्राम पंचायतचे उपसरपंच मोरेश्वर आस्वले यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT