बल्लारपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार file photo
चंद्रपूर

धक्कादायक! बल्लारपूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पिडीतेने संपवले जीवन

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : देशभरात तसेच राज्यामध्ये अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. चंद्रपुरातदेखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना बुधवारी समोर आली. याप्रकरणी संशयित आरोपी शिवम दुपारे (वय.20) याच्यावर पोक्सोतंर्गत गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदपूर शहराला लागून असलेल्या बल्लारपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने मध्यरात्री लॉजवर घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि.2) बल्लारपूर येथे घडली होती. घटनेच्या तक्रारीनंतर आरोपी शिवम दुपारे (वय 20) याला पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली. मात्र घटनेच्या दोन-तीन दिवसानंतर पीडित अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि.4) राहत्या घरी गळफास‍ घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली.

या घटनेची माहिती होताच बल्लारपूर शहरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मुलीच्या घरी जावून पंचनामा करुन पिडीतेचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला. अत्याचार झाल्यामुळेच अल्पवयीन पिडीतेने जीवनयात्रा संपवल्याचे पोलिसांच्‍या प्राथमिक तपासात निष्कर्षात समोर आले आहे. यानंतर मुलीचा मृतदेह चंद्रपूरला शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी समजूत काढल्यामुळे काही वेळांनतर तणाव ‍निवळला. ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्या लॉजचे मॅनेजर व मालकावर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड, वरोरा, चंद्रपूर आणि आता बल्लारपूर शहरात अत्याचाराच्या घटनेनंतर पिडीतेने आत्महत्या केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT