कराड हादरले! अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

एकास अटक, कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद
A minor girl has been abused by two for the last three years
कराड हादरले! अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार File Photo
Published on
Updated on

कराड : पुढारी वृत्तसेवा

देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच कराड तालुक्यातही असा प्रकार उघडकीस आला आहे. कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसात आज (मंगळवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी एकास अटक केली आहे.

विनोद विलास काटकर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन वर्षांपासून एक अल्पवयीन मुलगा व विनोद काटकर यांनी वेळोवेळी अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर झाली. विनोद काटकर याने तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला.

याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनोद काटकर व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी विनोद काटकर यास आज (मंगळवार) पहाटे अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिलारी करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news