इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख (Pudhari File Photo)
चंद्रपूर

Irai Dam Water Level Inspection |जिल्हाधिका-यांकडून इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी

Irai Dam Gate Opened | धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. तसेच इरई धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुध्दा वाढ झाली असून इरई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपूर शहरातील नदीलगत असलेल्या वस्तीला पुराच्या पाण्याचा तडाखा बसतो. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी केली.

चंद्रपूर जिल्ह्याला 24 जुलै रोजी ऑरेंज आणि 25 व 26 जुलै रोजी रेड अलर्ट होता. त्याअनुषंगाने जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. सध्या पाणी पातळी ही 206.35 मीटर एवढी आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही पाणी पातळी 206.08 मीटर एवढी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते.

धरणाची पाणी पातळी ही एस.ओ.पी. नुसार मेंटन ठेवावी तसेच एक तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा, जेणेकरून त्यांच्या ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये किंवा धरणाच्या पातळीतील नोंदी अचूक असाव्यात. कोणत्याही निष्काळजीपणाचा फटका नदीकाठावरील वस्त्यांना होऊ नये, अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिल्या.

त्या अनुषंगाने 28 जुलै पासून धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटर ने उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येईल किंवा पाण्याचा विसर्ग थांबण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापन अधिकारी श्री. राजूरकर यांनी दिली. यावेळी जलसंपदा विभागाचे विजय यादव, नायब तहसीलदार राजू धांडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT