Tadoba Wildlife Misbehavior Chandrapur Mohurli Road
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या चंद्रपूर ते मोहुर्ली मार्गावर चंद्रपुरातील काही उपद्रवी नागरिकांनी वाघ दिसताच धिंगाना घातल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघडकीस आला. वनाधिकाऱ्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्याने उपद्रवींनी त्यांच्यासोबतच राडा घालण्याचा प्रयत्न केला. दर शनिवारी रविवारी असा प्रकार घडत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र पर्यटनासाठी नागरिकांची नेहमीच हाऊसफुल्ल गर्दी असते. ताडोबा बाहेरही वाघांचे दर्शन नित्याची बाब झाली आहे. ताडोबा व्याघ् प्रकल्पातून जाणाऱ्या रस्त्यांचरही वाघांचे ये जा करणाऱ्यांना दर्शन होतात. त्यामुळेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या चंद्रपूर मोहुर्ली मार्गाने दर शनिवरी व रविवारी चंद्रपूरातील नागरिक वाहने घेऊन वाघांच्या दर्शनासाठी भ्रंमती करतात. रविवारी (1जून) चंद्रपूरातील काही नागरिक वाहनांनी या मार्गाने भ्रमंती करून वाघांचे दर्शन होताच चांगलाच धिंगाना घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूरच्या ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा चंद्रपूर ते मोहर्ली हा मार्ग 20 किलो मिटरचा आहे. या मार्गावर काही उपद्रवी पर्यटक वाहनाने या मार्गाने भ्रमंती केली.
दरम्यान, त्यांची भ्रमंती सुरू असतानाच वाघाचे त्याच रस्त्यावर दर्शन झाले. त्यामुळे व्याघ्र दर्शनाने उपद्रवी नागरिकांना आपलाहोह आवरता आला नाही. काही वाहनातील नागरिक खाली उतरून वाघांसोबत सेल्फी करण्याचा प्रत्यन करून लागले तर काहींनी जवळून खालील उतररून बघण्याचा प्रत्न केला. फुकटात आणि रत्यावरच वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला. ताडोबाच्या रस्त्यावरून नियमभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार सुरू असतानाच वनाधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपद्रवी व्यक्तींना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु वाघाच्या दर्शनाने आसुलले त्या व्यक्तींनी वनाधिकाऱ्यांसोबतच सुरू केली. राडा घालण्याचा प्रयत्न झाला.
वनाधिकाऱ्यांनी, वाहनाबाहेर उरतल्यास पाच हजाराचा दंड थोटावण्यात येईल अशी सुचना केल्यानंतरही ते उपद्रवी नागरिक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. तर वनाधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते. ताडोबाच्या मोहुर्ली मार्गावर घडलेला हा प्रकार वाघांच्याअधिवासात बाधा निर्माण करण्याचा गंभीर प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया वन्यजिव प्रेमींमध्ये उमटल्या आहेत. बऱ्याच वेळा त्या व्यक्तींना समजविल्यानंतर हा प्रकार थांबला. परंतु त्या दिवशी कुणावरही दंड ठोठावण्यात आला नाही.
हा प्रकार दर शविारी व रविवारी घडत असल्याची सुत्रांची माहिती आहे. सुटीचा दिवस असल्याचे नागरिक आपापली वाहने घेऊन मोहुर्ली प्रवेशद्वारापर्यंत जातात. त्या रस्त्याने वन्यप्राणी दिसताच ते व्यक्ती सैराट होतात आणि नियमभंग वागतात. कधी तर राजकिय नेत्यांची धमकी देऊन वनाधिकाऱ्यांनी कारवाई करू नये याकरीता दबाव टाकतात. रविवारच्या या प्रसंगाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने वन्यजिवांसोबत अशा प्रकारे वर्तणूक करणाऱ्या व्यक्तींबद्दील वन्यजीव प्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त् केल्या जात आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात उपद्रवी पर्यटकांनी धिंगाना घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याचेवर 5 हजाराचा दंड ठोठावण्यात येतो. आता पर्यंत ताडोबा मध्ये पर्यटनाला येऊन उपद्रवीपणा करणाऱ्या लोकांकडून सुमारे 28 लाखांचा दंड तिन वर्षात ठोठावण्यात आला आहे. परंमु मोहुर्ली मार्गावर चंद्रपूरातील काही व्यक्तींचा उपद्रवीपणा वाढत असल्याने वन्यजिव प्रेमींनी चिंता व्यक्त् केली आहे. याकरीता कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.