Chandrapur Umed mission Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | 'उमेद'मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना व बचतगटांना हक्काची बाजारपेठ

जिल्हास्थानी मार्ट तर तालुकास्थानी वाल मॉल

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Umed mission

चंद्रपूर : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर च्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला समूह कडून उत्पादित झालेल्या मालाची विक्री करण्याकरिता जिल्हास्तरावर राणी हिराई उमेद मार्ट  ज्युबिली हायस्कूल चंद्रपूर येथे तयार झाले. येथे जिल्ह्यातील 320 प्रकारचे उत्पादने विक विक्रीस ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांना व बचतगटांना हक्काची बाजारपेठ मिळालेली आहे. तसेच जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये उमेद वाल मॉल ची वास्तू लवकरच महिलांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी सज्ज होत आहे.उमेदच्या पुढाकाराने महिलांच्या जीवनात क्रांती आली आहे.

महत्वाचे म्हणजे,जिल्ह्यातील २६५००० महिलांना लखपती करण्यात यश आले आहे. महिलांचे विविध व्यवसाय सुरुवात करून कुटुंबाच्या आर्थिक उत्पनात वाढ करण्यासाठी महिला स्वतः पुढे आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४४३०० महिलांचे व्यवसाय सुरू आहेत. ज्यामध्ये ७९६ उत्पादक समूह असून १० महिला उत्पादक कंपनी स्थापन झाल्या असून त्यांचे प्राथमिक कार्य सुरु झाले आहे.या महिलांना आता उत्पादने विक्रीसाठी जिल्हास्थानी हिराई उमेद मार्ट उपलब्ध झाले असून  तालुकास्थानी उमेद वाल मॉल लवकरच उपलब्ध होणार आहे.

५५ उत्पादनाची ऑनलाइन विक्री

उमेदने महिलांना, उमेद मार्ट नावाने ऑनलाईन डिजिटल विक्री प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असून जिल्ह्यातील ५५ प्रकारची प्रॉडक्ट ऑनलाइनच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. महिला फेसबुक व्हाट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करीत आहेत.

हिराई उमेद मार्ट मध्ये ३२० उत्पादने

जिल्ह्यातील महिला समूह कडून उत्पादित झालेल्या मालाची विक्री करण्याकरिता जिल्हास्तरावर राणी हिराई उमेद मार्ट  ज्युबिली हायस्कूल चंद्रपूर येथे  जिल्ह्यातील 320 प्रकारचे उत्पादने  विक्रीस ठेवण्यात आली आहेत.महिलांचे उत्पादने मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये त्यांनी तयार केलेल्या मॉलमध्ये तसेच सरस प्रदर्शनी मध्ये पाठवण्याची व्यवस्था अभियानाच्या माध्यमातून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT