theft pudhari photo
चंद्रपूर

Chandrapur Theft | गर्दीचा फायदा घेत एसटी बस मध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

वरोरा तालुक्यातील शेगाव बसमधील घटना, ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस

पुढारी वृत्तसेवा

Warora ST Bus Theft

चंद्रपूर:  वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथे धावत्या बसमध्ये अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विंगाव (आबादी), ता. वरोरा येथील रहिवासी रेखा दिलीप आवारी (वय ५३) या आपल्या नणंद कमलबाई मानिकराव डाहुले यांच्यासोबत शेगाव (बु.) येथील बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी आटोपल्यानंतर दोघीही गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकावरून बसमध्ये चढल्या.

बस प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रेखा आवारी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राचे वजन सुमारे १० ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले असून, त्याची किंमत जवळपास ५० हजार रुपये आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT