Gambling Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Gambling Raid | वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ५ जण ताब्यात

चार दुचाकी, रोख रकमेसह ३ लाख ६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Warora Police Gambling Den Raid

वरोरा : चंद्रपूर : वरोरा शहरातील गाणफाडे ले-आऊट परिसरात बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी धाड टाकत पाच जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत चार दुचाकी, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गाणफाडे ले-आऊट येथील सुनिल चवले यांच्या बंद घरात काही व्यक्ती पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यादरम्यान पोलिसांना पाच जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून अंगझडतीतील ९ हजार २०० रुपये, जुगाराच्या डावावर असलेली २ हजार ३० रुपये रोख रक्कम, पत्ते आणि चार दुचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी जयकुमार विजय वाघिरे (२९), खुशांत पांडुरंग कायरकर (१८), निलेश शंकरराव गोरे (४५), रविंद्र बंडू येटे (३३) आणि रुपेश सुरेश आंबुरकर (३७) या पाच जणांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तालेवार यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम ४ व ५ अन्वये एफआयआर क्रमांक ०९२८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश काशीनाथ मोरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT