Chandrapur: Thieves stole two and a half lakh rupees from the diki of a two-wheeler
चंद्रपूर : चोरट्यांनी गाडीच्या डिक्‍कीतून सव्वा दोन लाख रुपये उडविले File Photo
चंद्रपूर

चंद्रपूर : मान्सून सेल पडला महागात, दुचाकीच्या डिक्‍कीतून सव्वा दोन लाख चोरीला

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

शेती हंगामासाठी काढण्यात आलेले क्रॉप लोणचे पैसे काढून मान्सून सेल लागलेल्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ही शॉपिंग चांगलीच महागात पडली. या महिलेने दुचाकीच्या डिक्की मध्ये ठेवलेले 2 लाख 20 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना राजुरा येथे उघडकीस आली. राजुरा शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे पोलिसांसमोर आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

राजुरा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या घटनेची फिर्यादी वैशाली गणेश अनसाने (वय 47) ही महिला आहे.  सद्या बुटीबोरी येथे राहते. राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वर येथे त्‍यांची शेती आहे. शेतीहंगामासाठी पीक कर्ज घेण्यासाठी संबंधीत महिला राजुरा येथे आली होती. जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह  बँक राजुरा येथून 2 लाख 20 हजार रुपये पीक कर्ज मंजूर होते. यासाठी ती बहिण जयश्री आनंद सगोले हिच्यासोबत रकमेची उचल करण्याकरिता बँकेत गेलेली होती. पीक कर्जाची मिळालेले नगदी रक्कम बँकेतून त्यांनी घेतली व ती रक्कम आपल्‍या दुचाकी क्रमांक एम एच 34 बी 3541 या दुचाकी वाहनाच्या डिक्की मध्ये ठेवली.

यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संबंधीत महिला आपल्‍या बहिणीसोबत कपडे खरेदी करण्यासाठी गांधी चौक येथील परिवार कलेक्शन या दुकानात गेल्‍या. या दरम्यान कपडे खरेदी करण्यासाठी आत गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने गाडीच्या डिक्की मधील सव्वा दोन लाख रुपये लंपास केले. अर्ध्या तासांनी कपडे खरेदी करून बाहेर आल्यानंतर फिर्यादीने गाडीच्या डिक्‍की मधील पैशाची तपासणी केली, मात्र पैसे दिसत नसल्‍याने पैसे चोरीला गेल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीस स्टेशन गाठून त्यांनी तक्रार नोंदविली. राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

राजुरा शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार होता आहेत. चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

पावसाळा सुरू होताच शहरातील अनेक ठिकाणी मान्सून सेल सुरू झाले आहेत. यामुळे कपडे खरेदी करण्यासाठी महिलांची तोबा गर्दी उसळलेली आहे. बऱ्याच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही, सुरक्षा कर्मचारी नाहीत अशा स्थितीत वाहने पार्किंग करून बऱ्याचदा ग्राहक खरेदीसाठी येत असतात याचा गैरफायदा चोरटे घेत आहेत.

SCROLL FOR NEXT