Road Condition At Savali District
गेवरा ते विहीरगांवाकडे जाणारा खड्डेमय रस्ता Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपूर : खड्डेमय रस्त्यांमुळे एसटी सेवा सहा महिण्यांपासून बंद !

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : सावली तालुक्यातील गेवरा ते विहीरगांवाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रस्ता हा जागोजागी खड्ड्यांनी व्यापलेला आहे. या कारणांमुळे या दोन्ही गावांच्या मार्गावरील बसची वाहतूक मागील सहा महिण्यांपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे या गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची प्रवासासाठी गैरसोय होत आहे.

सहा महिण्यांपासून परिवहन महामंडळाच्या ब्रम्हपुरी डेपोची एस टी बस गेवरा परिसरातील करोली,कसरगांव, गेवरा खुर्द, विहीरगांव, बोरमाळा, चिखली डोंगरगांव येथे जात होती. परंतू या मार्गाच्या रस्त्याची अवस्था खराब झाल्याने वाहतूक सुविधा बंद करण्यात आली आहे. सात गावातील नागरिकांचे यामुळे बेहाल सुरू असताना कार्यकर्ते, लोक प्रतिनिधींचे लक्ष वेधले परंतु अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. आता पावसवाळा सुरू झाल्याने नागरिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ब्रम्हपुरी डेपोच्या या मार्गे धावणाऱ्या सर्व बसेस बंद असल्याने संपूर्ण उन्हाळा आणि पावसाळा सुरू झाल्याने सात गावांतील प्रवाशांचे हाल होत आहे. या गावातील नागरिकांची प्रवासाची समस्या लक्षात घेता ब्रम्हपुरी वरुन येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बसेस गेवरा वरुन विहीरगांव, चिखली, डोंगरगांव, निफंद्रा मार्गे तात्काळ सुरु कराव्यात अशी मागणी सातही गावातील नागरिकांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT