वीज वाहिनीसह वीजखांब ओढत एसटी बस सुसाट!

गुहागरात पाटपन्हाळे येथील प्रकार
St Accident In Guhagar
एसटी बसPudhari File Photo
Published on
Updated on

गुहागर शहर, पुढारी वृत्तसेवा : एसटी बसने सर्व्हिस वायरला तोडून तीन वीजखांब ओढत ती सुसाट निघून गेल्याचा प्रकार तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथे घडला. यामुळे गेले दोन दिवस कोंडवाडी अंधारात होती. चालकाच्या या बेपर्वाईमुळे येथील ग्रामस्थांनी एसटी प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे महावितरणचे सुमारे 40 हजाराचे नुकसान झाले असून गुहागर आगाराला याबाबत पत्र देऊन नुकसानभरपाईची मागणी केल्याची माहिती शृंगारतळी महावितरणचे सहायक अभियंता मंदार शिंदे यांनी दिली.

गुहागर आगारातून सकाळी 11 वाजता सुटणारी गुहागर-पेवे पाटपन्हाळे मार्गे जाणारी विद्यार्थ्यांना शृंगारतळी शाळेत घेऊन येणारी एसटी बस पाटपन्हाळे कोंडवाडी येथे आली. या दरम्यान, ही बस पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे यांच्या घराजवळ आली असता रस्त्यावरून एका घराकडे गेलेली विजेची सर्व्हिस वायर व तिला जोडून असणारी ‘जीआय’ची तार बसने ओढत नेली.

St Accident In Guhagar
Nashik accident | नांदगावी एसटी बस- अल्टो कारचा भीषण अपघात; माय लेकासह लेकीचा जागीच मृत्यू

त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने उभे असलेले सिमेंटचा 1 व लोखंडी 2 असे 3 वीजखांब तुटले. एवढा प्रकार घडूनही एसटी चालक न थांबा तो बस सुसाट घेऊन गेला. दरम्यान, यावेळी घडलेला प्रकार तेथील काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. गेले दोन दिवस कोंडवाडीतील काही घरे वीजेअभावी अंधारात होती. दिवसभर मुसळधार पाऊस असूनही महावितरणचे अधिकारी, कर्मचार्यांनी येथे कामगार लावून वीजखांब उभे केले व वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे सुमारे 40 हजाराचे नुकसान झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news