खून घडलेल्‍या ठिकाणी परिसरातील लोकांची गर्दी झाली होती. Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Crime | चंद्रपूर हादरलं: मुलाने कुऱ्हाडीने वडिलांचा केला निर्घृण खून!

शेतीचा व घरगुती वादामुळे मुलाने उचलले टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

chandrapur son axe murder father crime 2025

चंद्रपूर : घरगुती वादातून मुलाने स्वतःच्या वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत येणाऱ्या विठ्ठल मंदिर वार्डात आज शनिवारी ( 19 जुलै 2025) रोजी सकाळी साडेदहा वाजताचे सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी अभय गुलाबराव दातारकर (वय 35 ) याने त्याचे वडील गुलाब दातारकर (वय 65 वर्षे) यांच्याशी शेतीच्या कारणावरून वाद घातला. वादाच्या रागात त्याने कुऱ्हाड घेऊन वडिलांच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार केले. या हल्ल्यात गुलाब दातारकर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला व मृतदेह उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, आरोपी अभय दातारकर याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव व शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार स्वतः करत असून, तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT