चंद्रपूर

चंद्रपूर : सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नागभिड तालुक्यातील घटना

मोहन कारंडे

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नागभिड तालुक्यात सहा वर्षीय चिमुरडीवर एका ५२ वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. सुधाकर महादेव निमगडे असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिलीच्या वर्गात शिकणारी पिडित मुलगी रविवारी (दि.११) आई-वडील शेतावर गेल्यामुळे घरी एकटीच होती. त्यावेळी संशयित सुधाकर निमगडे याने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून मोटारसायकलवरून गावातील चौकात असलेल्या दुकानात नेले. त्याचे आणि पिडित मुलीच्या कुटुंबाचे संबंध चांगले असल्यामुळे ती त्याच्यासोबत दुकानात गेली. दुकानातून चॉकलेट घेतल्यानंतर संशयित आरोपी मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने चिमुकलीवर अत्याचार केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT