Sindewahi Tipper Bus Collision  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Bus Accident | टिप्पर - बसची समोरासमोर धडक; अनेक प्रवासी जखमी

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) पुलाजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

Sindewahi Tipper Bus Collision

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) पुलाजवळ गुरुवारी (दि.२) चार वाजताच्या सुमारास टिप्पर आणि बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, जखमींमध्ये पवणी, नागभीड, तळोधी बा. तसेच परिसरातील काही प्रवाशांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही तुमसर डेपोची चंद्रपूर–तुमसर मार्गावर धावणारी बस होती. पळसगाव (जाट) पुलाजवळ बस आणि टिप्पर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही घटना सिंदेवाही  पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून, पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा आणि पुढील तपास करत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT