Sindewahi Gambling Den Raid
चंद्रपूर : जिल्ह्यातील अवैध जुगारावर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने आक्रमक पवित्रा घेतला असून, सिंदेवाही तालुक्यात ५२ ताश पत्त्यांवर सुरू असलेल्या हार–जितच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १२ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ मोटार सायकलसह एकूण २ लाख ७० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मंगळवारी ( दि.३) स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन सिंदेवाही हद्दीत काही इसम ५२ ताश पत्त्यांवर पैशांची हार–जित लावून जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली.
या कारवाईनंतर पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्रमांक ११६/२०२६ अन्वये जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. छाप्यात डावावर ठेवलेले १,५०० रुपये, आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले १९,२०० रुपये, ५२ ताश पत्ते (किंमत ५० रुपये) तसेच आरोपींच्या ताब्यातील ७ मोटार सायकल (अंदाजे किंमत २,५०,००० रुपये) असा एकूण २,७०,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी मध्ये सलिम चांद खान पठाण (वय ३०), दिपरत्न अंबादास खोब्रागडे (वय ३१), जावेदन कादरखान पठाण (वय ३२),अरुण प्रभाकर नन्नावरे (वय ५०), संतोष तुळशीराम नान्हे (४२), पांडुरंग देवाजी पुसतोडे (वय ४५), पुरुषोत्तम मणिराम बांबोळे (वय ५०), प्रकाश कवडु आदे (वय ३५), सारंग जगन्नाथ निमगडे (वय ४७), जितेंद्र महादेव करकाडे (वय ४४) सर्व रा. सिंदेवाही आदींचा समावेश आहे. याशिवाय निखिल राऊत (रा. नांदेड, ता. नागभीड) व मोटार सायकल क्रमांक MH-34-E-7952 चा चालक यांचा शोध सुरू असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पो.हवा. जयंत चुनारकर, अजित शेंडे, प्रदीप मडावी, नितेश महात्मे व गजानन मडावी (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी सहभाग घेतला.