गायेगाव येथील शेतकरी दिवाकर पाहणपट्टे यांनी बैलावर बसून थेट तहसील कार्यालय गाठत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले  Pudhari
चंद्रपूर

Farmer Protest Chandrapur | "कर्जमाफी झालीच पाहिजे"; म्हणत शेतकऱ्याचे बैलावर बसून तहसील कार्यालयात अनोखे आंदोलन

राज्य सरकारच्या घोषणेनंतरही लाभ न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याची आक्रमक भूमिका; तहसील परिसरात घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

Rajura Tehsil Office Farmer Protest

चंद्रपूर : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राजुरा तालुक्यातील गायेगाव येथील शेतकरी दिवाकर हिरामण पाहणपट्टे यांनी बैलावर बसून थेट तहसील कार्यालय गाठत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

राजुरा तालुक्यात एका शेतकऱ्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी अनोख्या आणि लक्षवेधी पद्धतीने आंदोलन छेडले. "कर्जमाफी झालीच पाहिजे" अशी ठाम आणि आक्रमक भूमिका घेत संबंधित शेतकरी बैलावर स्वार होऊन थेट तहसील कार्यालयात पोहोचला. या अनोख्या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ उत्सुकता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले.

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही. तसेच कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून किंवा संबंधित बँकांकडून स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी वाढत आहे. याच नाराजीचा उद्रेक या आंदोलनातून पाहायला मिळाला.

या शेतकऱ्याने बैलावर बसून संपूर्ण तहसील कार्यालय परिसरात फेरी मारली आणि "कर्जमाफी झालीच पाहिजे", "शेतकऱ्यांना न्याय द्या" अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात लाभ मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. बँका आणि प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकरी संघटनांनीही कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्याची मागणी केली असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT