Chandrapur gambling case
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नागपूर मार्गावरील हॉटेलमध्ये जुगार खेळताना स्थानिक गुन्हे शाखेने दहा जणांना आज सोमवारी छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे सव्वातीन लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील एनडी हॉटेलमध्ये ११२ नंबरच्या खोलीमध्ये ५२ तास पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकला.
यावेळी दहा जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून ५२ तास पत्ते आणि तीन लाख दहा हजार सहाशे दहा रुपये रोख आढळून आली. रामनगर पोलीस ठाण्यामध्ये या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा जय सिंह, चेतन गज्जलवार, पोअं. प्रशांत नागोसे, शशांक बादामवार, मिलींद जांभुळे, नितीन रायपुरे, किशोर वाकाटे यांनी केली आहे.