Ratnagiri Court Verdict | पतीशी फोनवर बोलते, प्रेयसीच्या खूनप्रकरणी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा

रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Court Verdict
प्रातिनिधिक छायाचित्र (File photo)
Published on
Updated on

Ratnagiri Girlfriend Murder Case

रत्नागिरी: पतीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सोमवारी (दि.२८) हा निकाल दिला. मारुती राजाराम मोहिते (वय ५५, रा. घुणकी, ता. हातकणंगले, कोल्हापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १४ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३.३० ते ४. १५ च्या दरम्यान जयगड येथील डेक्कन ओव्हरसीज प्रा.लि कंपनीच्या गेस्टहाऊसच्या रुममध्ये घडली होती.

मारुती मोहिते या कंपनीत कामाला होता. तसेच मृत महिला ही त्या कंपनीमध्ये जेवण आणि साफसफाईचे काम करायची. त्यांच्यात ओळख होउन त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. परंतू, मृत महिला ही आपल्या पतीशी फोनवर बोलते, या गोष्टीचा आरोपी मोहितेला राग यायचा. दरम्यान १४ डिसेंबर रोजी ही दोघही कंपनीच्या गेस्ट होउसमधील रुममध्ये असताना त्या महिलेला पतीचा फोन आला. ती फोनवर बोलत असल्याचे पाहून मारुती मोहितेने रागाच्या भरात तिच्या डोक्यात किचन ट्रॉलीच्या पट्टीने मारहाण केली.

गंभीर जखमी झालेली महिला तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर मोहितेने रुमला बाहेर कडी लावून तिथून पळ काढला. काही वेळाने त्याठिकाणी कंपनीचा एक कामगार आला असता त्याला ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्याने आरडा-ओरडा करताच कंपनीतील इतर कामगारांनी तिथे येऊन जखमी महिलेला प्रथम जयगड येथील रुग्णालयात व नंतर रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना १६ डिसेंबर २०२० रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृत महिलेचे चुलत सासरे रविंद्र वझे यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हाचा दाखल केला होता.

या प्रकरणी जयगडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी संशयिताला अटक करुन तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे पुष्पराज शेट्ये यांनी १९ साक्षीदार तपासले. यातील सरकारी कर्मचारी हर्षदा, डॉ. कुंभारे, डॉ. चौधरी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी आरोपीला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड तसेच १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात अ‍ॅड. पुष्पराज शेट्ये यांना अ‍ॅड.श्रुती शेट्ये यांनी साथ दिली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक अनंत जाधव, पोलीस हवालदार वंदना लाड, पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी काम पाहिले.

Court Verdict
रत्नागिरी : चिमुकल्यासह दोन महिलांचा डोहात बुडून मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news