Chandrapur Crime   File Photo
चंद्रपूर

Chandrapur Crime | चॉकलेटचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

नागभीड तालुक्यातील बोन्ड (राजोली) येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Nagbhid taluka minor assault

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील बोन्ड (राजोली) येथे 19 वर्षीय युवकाने चॉकलेट चे आमिष दाखवून चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि. 17) सकाळी 11 च्या दरम्यान उघडकीस आली. आरोपीचे नाव संचित प्रवीण बगडे (19 वय) असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी संचित बडगे हा मंडप डेकोरेशनचे काम करतो. आरोपी चे घर पीडित बालिकेच्या च्या घराजवळ आहे. पीडित बालिकेचे वडील हे संचितचे नात्याने मामा असल्याने त्याचे नेहमीच त्यांच्या घरी येणे जाणे करायचा. रविवारी सकाळी 10 वाजताचे दरम्यान संचित बालिकेच्या घरी गेला व बालिकेस चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून नवीन घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी नेऊन बालिकेवर लैंगिक अत्याचार केला.

सदर बालिकेने घरी येऊन आपल्या आईला याबाबत सांगितले. पीडित बालिकेच्या वडिलांच्या तक्रारी नुसार नागभीड पोलिसांनी आरोपी संचित बगडे याचे विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्ह्यांची नोंद करुन आरोपीस अटक केली आहे.

नागभीडचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. बालिकेच्या तपासणी करिता चंद्रपूर येथून फॉरेन्सिक टीम आज सकाळी नागभीड पोलीस स्टेशन ला हजर झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT