Chandrapur Voting Percentage
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (दि.१५) शहरात मतदान प्रक्रिया सुरू असून, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३८.१२ टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
निवडणूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३.३० वाजेपर्यंत शहरातील एकूण १ लाख १४ हजार ३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ५८ हजार ०५५ पुरुष, ५६ हजार ३१० महिला आणि २ अन्य मतदारांचा समावेश आहे.
शहरातील १७ प्रभागांमधील मतदान केंद्रांवर सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असून, दुपारनंतर मतदारांचा प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. महिला मतदारांचा सहभाग उल्लेखनीय असून, पुरुष व महिला मतदानातील फरक अत्यल्प आहे.
निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून, अंतिम मतदान टक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकूणच, दुपारी ३.३० वाजेपर्यंत समाधानकारक मतदान झाले असून, उर्वरित वेळेत मतदारांचा प्रतिसाद कसा राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.