मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर मनपाचे वसुली पथक नळ कनेक्शन तोडताना  Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपूर महापालिकेची मोठी कारवाई; ८६ मालमत्ता जप्त, ४४ नळ कनेक्शन कपात

Chandrapur Municipal Corporation | थकबाकीदारांच्या विरोधात धडक मोहीम

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपुरात महानगर पालिकेच्या वतीने थकबाकी कीदारांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर मनपाच्या वसुली पथकांची कारवाई सुरु असुन 86 मालमत्ता जप्त केल्या. तर 44 नळ कनेक्शन धारकांचे नळ कापण्यात आले. (Chandrapur Municipal Corporation)

जप्त मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया करून थकीत रक्कम वसुलीची कारवाई करण्याकरीता झोननिहाय ३ पथके गठीत करण्यात आली आहे. थकबाकीचा भरणा न केल्यास जप्ती केलेल्या मालमत्तांवर 15 दिवसांच्या आत कारवाई करण्याचा अधिकार मनपाला असल्यांने पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे .यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने मनपाने सक्तीचे पाऊल उचलले आहे.

15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी 50 टक्के शास्तीत सवलतीचा लाभ घेतला होता. 15 फेब्रुवारी नंतर ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.

ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT