MBBS students death Chandrapur
चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील एमबीबीएसचे तीन विद्यार्थी चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर सावली तालुक्यातील व्याहाड बुज, जवळील वैनगंगा नदीच्या पुलाखाली काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता चे सुमारास बुडाले होते. आज रविवारी तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळाले आहेत. गोपालगणेश साखरे (वय २०) रा. चिखली, जि. बुलढाणा, पार्थ बाळासाहेब जाधव (वय २०) रा. शिर्डी, जि. अहिल्यानगर व स्वप्निल उद्धवसिंग शिरे (वय २०) रा. छत्रपती संभाजीनगर अशी मृतकांची नावे आहेत. तिघेही जण गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते.
गडचिरोली येथील मेडिकल कॉलेज मध्ये प्रथम वर्षाला असलेले काही विद्यार्थी सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळसाठी आले होते. तत्पूर्वी ते व्हॉलीबॉल खेळत होते. खेळता खेळता व्हॉलीबॉल पाण्यात गेला. तो हॉलीबॉल नदीतून काढण्याच्या प्रयत्नात गोपाल गणेश साखरे ( वय 20) रा. चिखली , जि. बुलढाणा, पार्थ बाळासाहेब जाधव ( वय २० ) रा. शिर्डी,जिल्हा अहमदनगर, स्वप्निल उद्धवसिंग शीरे ( वय २० ) संभाजीनगर , औरंगाबाद हे तिघे वैनगंगा नदीत बुडाले.
घटनेची माहिती सोबत असलेल्या अन्य विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली. सावली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वळण वैनगंगा नदीत शोध मोहीम राबवली. परंतु अंधार झाल्यामुळे शोध म्हणून थांबविण्यात आली. काल एकाही विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळाले नाहीत. आज पुन्हा रविवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या मृतदेहासाठी शोध मोहिम सुरू करण्यात आली. काही वेळांनी तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह पोलिसांना मिळाले. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय सावली येथे शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आले. तिन्ही विद्यार्थी गरीब कुटुंबातील होते.साखरे,जाधव व शिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलाखाली व्हॉलीबॉल खेळता खेळता काल शनिवारी नदीत बुडालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांची माहिती राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांना होताच आज त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. साखरे,जाधव व शिरे कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले व मृतक विदयार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.